सोलापूर महापालिका पोटनिवडणुकीत नवरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

रिंगणातील उमेदवार 
सद्दाम शाब्दी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), रणजितसिंह दवेवाले (भाजप), कय्युम सिद्दकी (मनसे), बापू ढगे (शिवसेना), गौस कुरेशी (हिंदुस्थान जनता पार्टी), पीरअहमद शेख (एमआयएम), तौफिक हत्तुरे (कॉंग्रेस), नलिनी कलबुर्गी (माकप) आणि वसीम सालार (अपक्ष). 

सोलापूर : महापालिका प्रभाग 14 क च्या पोटनिवडणुकीतून 17 पैकी आठजणांनी माघार घेतली. त्यामुळे आता या जागेसाठी नवरंगी लढत होणार आहे. आज (शनिवारी) चिन्ह वाटप होणार असून, रिंगणातील अंतिम उमेदवारांचीही यादी प्रसिद्ध होईल. 

 उपेंद्र दासरी (भाजप), महंमद सातखेड (माकप), कादर बाबानगरी (एमआयएम), नसीम खलिपा बागवान (एमआयएम), मुबीन वड्डो (अपक्ष), ज्ञानेश्‍वर अंजीखाने (भाजप), गंगाधर साठे (शिवसेना), जरगीस गफूर मुल्ला (अपक्ष) यांनी माघार घेतली. 

शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, अखेर भाजपचे माजी नगरसेवक बापू ढगे यांना शिवसेनेच्या उमेदवारीची लॉटरी लागली. नसीम खलिपा यांच्या उमेदवारीमुळे एमआयएमचे उमेदवार पीरअहमद शेख अडचणीत आले होते. मात्र खलिपा यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे श्री. शेख यांच्यावरील "टेन्शन'दूर झाले आहे. त्यामुळे आता एका अपक्षासह आठ पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. 

रिंगणातील उमेदवार 
सद्दाम शाब्दी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), रणजितसिंह दवेवाले (भाजप), कय्युम सिद्दकी (मनसे), बापू ढगे (शिवसेना), गौस कुरेशी (हिंदुस्थान जनता पार्टी), पीरअहमद शेख (एमआयएम), तौफिक हत्तुरे (कॉंग्रेस), नलिनी कलबुर्गी (माकप) आणि वसीम सालार (अपक्ष). 

Web Title: Solapur news municipal corporation by poll