परवडणाऱ्या घरांसाठी सोलापूरकरांचा 'स्मार्ट' सहभाग 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 29 जानेवारी 2018

"व्याज आधारीत पतपुरवठा' या विभागाचा लाभ देण्यासाठी शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या योजनेतून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा व्हावा यादृष्टीने प्रयत्न केले जातील. 
- महेश क्षीरसागर, प्रकल्प संचालक, पंतप्रधान आवस योजना, महापालिका 

सोलापूर : मध्यमवर्गीय तसेच झोपडपट्टीतील सोलापूरवासियांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत "सर्वांसाठी घरे' प्रकल्पाची स्मार्ट अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल 51 हजार 404 जणांनी नोंदणी केली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठीही 726 सदनिकांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

पहिल्या टप्यात शहरातील 12 झोपडपट्यांचा विकास होणार आहे. त्यामध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर भाग एक व दोन, शिकलगार वस्ती, गुरुमाता झोपडपट्टी, जोशी गल्ली, यल्लेश्‍वरवाडी, जयभीमनगर वाढीवभागासह, धाकटा राजवाडा, गुल्लापल्ली कारखाना, कबीरमठ झोपडपट्टी, हरिजन वस्ती पाथरूट चौक येथील झोपडपट्टींचा समावेश आहे. 

झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पांतर्गत 39 झोपडपट्ट्यातील 11953 सदनिका, परवडणारी घरे प्रकल्पांतर्गत महापालिका कर्मचाऱ्यांसाठी 726 सदनिका, खासगी प्रवर्तकाकडून प्राप्त 1127 सदनिका आणि लाभार्थी प्रोत्साहीत घरे योजनेंतर्गत 362 सदनिकांचा प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचे आराखडे निश्‍चित करण्यात आले असून, मंजुरी मिळाली की कार्यवाही सुरु केली जाणार आहे. 

"व्याज आधारीत पतपुरवठा' या विभागाचा लाभ देण्यासाठी शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या योजनेतून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा व्हावा यादृष्टीने प्रयत्न केले जातील. 
- महेश क्षीरसागर, प्रकल्प संचालक, पंतप्रधान आवस योजना, महापालिका 

आकडे बोलतात... 
असे आले आहेत अर्ज 
- झोपडपट्टी पुनर्वसन ः 5773 
- व्याज अनुदान ः 614 
- परवडणारी घरे ः 43,314 
- बांधकाम अनुदान ः 1703 
- एकूण ः 51,404 

Web Title: Solapur news Municipal Corporation Smart city project