सोलापूर महापालिकेतील जादा कर्मचारी " हिटलिस्ट" वर

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 6 डिसेंबर 2017

सोलापूर - शासनाच्या योजनेंतर्गत मानधनावर नियुक्त केलेले लक्ष्मण बाके आणि दत्तात्रय चौगुले यांना मुदतवाढ नाकारली आहे. त्यांच्या जागी इतर अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली.

 त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार केला असून, अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर हे आदेश जारी होतील. 

सोलापूर - शासनाच्या योजनेंतर्गत मानधनावर नियुक्त केलेले लक्ष्मण बाके आणि दत्तात्रय चौगुले यांना मुदतवाढ नाकारली आहे. त्यांच्या जागी इतर अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली.

 त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार केला असून, अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर हे आदेश जारी होतील. 

महापालिका सध्या आर्थिक अडचणीत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेचा अनावश्‍यक पैसा कशावर खर्च होतो, याचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी "या' दोन खातेप्रमुखांना महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकूण वेतनापेक्षा जास्त मानधन द्यावे लागत असल्याचे दिसून आले. या दोघांच्याही नियुक्तीचा कालावधी संपला होता. मुदतवाढ देण्याबाबत त्यांनी अर्ज दिला होता. मात्र आयुक्तांनी त्यांचा अर्ज नामंजूर केला आणि त्यांना तत्काळ "कार्यमुक्त' करावे तसेच 4 डिसेंबरपर्यंतचे मानधन त्यांना द्यावे, असे आदेश दिले आहेत. हे दोन्ही अधिकारी समाज विकासतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सध्या श्री. बाके यांच्याकडे पंतप्रधान आवास योजनेची तर श्री. चौगुले यांच्याकडे स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि महिला बालकल्याण अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. 

जीआयएस प्रणालीअंतर्गत अनेक इमारतींची सदोष पद्धतीने नोंदणी झाल्याने महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. डॉ. ढाकणे यांनी स्वतः केलेल्या पाहणीनंतर जीआयएसचा सर्व्हे आणि त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नोंदीतील फोलपणा उघडकीस झाला. त्यामुळे संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीनंतर या प्रकरणात दोषी आढळलेल्या पालिकेतील अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई, तर मानधन तत्त्वावर असलेल्यांना घरी पाठविण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे या विभागाच्या कामाला वेग येऊन अचूक नोंदी होण्यास मदत होईल व पालिकेचे उत्पन्न वाढेल, असे प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मत आहे. 

"हे' अधिकारी आहेत "रडार'वर 
वर्षानुवर्षे एकाच पदावर असलेले, पदाधिकाऱ्यांना "मॅनेज'करून स्वतःची खुर्ची "पक्की' केलेले काही अधिकारी आयुक्तांच्या "रडार'वर आहेत. अशा सर्व अधिकाऱ्यांची "कुंडली' आयुक्तांनी जमा केली आहे. अचूक वेळ आली, की संबंधितावर कारवाईचे नियोजन आयुक्तांनी केले आहे. याचे कर्मचाऱ्यांतून स्वागत होत आहे. श्री. बाके आणि श्री. चौगुले यांना कार्यमुक्त केल्याचे आदेश आज बुधवारी सकाळी जारी होतील, असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

Web Title: solapur news municipal extra employee on hitlist