पुंडलिक मंदिर देवस्थानच्या विश्‍वस्तांचा खून 

अभय जोशी
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

संतोष चंद्रकांत अधटराव (रा.हनुमान मैदान, पंढरपूर) हे काल दुपार पासून बेपत्ता झाले होते. त्यांचे कुटुंबिय यांचा शोध घेत होते. दरम्यान काल रात्री मोहोळ तालुक्‍यात शेजबाभुळगाव येथील कालव्याच्या कडेला एक मतृदेह सापडला. कोणीतरी धारदार शस्त्राने वार करुन त्या व्यक्तीचा खून केला असल्याचे दिसत होते. मोहोळ पोलिसांनी तपास केल्यावर पंढरपूर येथील संतोष अधटराव हे बेपत्ता असल्याची माहिती त्यांना मिळाली.

पंढरपूर - येथील श्री पुंडलिक मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त संतोष चंद्रकांत अधटराव (वय 44) यांचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. ही घटना काल रात्री मोहोळ तालुक्‍यातील शेजबाभुळगाव जवळ अधटराव यांचा मृतदेह सापडला. 

या घटनेची समजलेली माहिती अशी की, संतोष चंद्रकांत अधटराव (रा.हनुमान मैदान, पंढरपूर) हे काल दुपार पासून बेपत्ता झाले होते. त्यांचे कुटुंबिय यांचा शोध घेत होते. दरम्यान काल रात्री मोहोळ तालुक्‍यात शेजबाभुळगाव येथील कालव्याच्या कडेला एक मतृदेह सापडला. कोणीतरी धारदार शस्त्राने वार करुन त्या व्यक्तीचा खून केला असल्याचे दिसत होते. मोहोळ पोलिसांनी तपास केल्यावर पंढरपूर येथील संतोष अधटराव हे बेपत्ता असल्याची माहिती त्यांना मिळाली. शेजबाभुळगाव येथे सापडलेल्या मतृदेहाच्या हातावरील गोंदलेली अक्षरे तसेच अंगावरील कपडे याची माहिती मोहोळ पोलिसांनी पंढरपूर पोलिसांना पाठवली. त्यानंतर सापडलेली मृतदेह संतोष अधटराव यांचा असल्याचे निष्पन्न झाले. 

दरम्यान या घटनेची माहिती समजताच पंढरपूर येथील महादेव कोळी समाजातील अनेक जण मोहोळ कडे रवाना झाले आहेत. संतोष अधटराव यांचा खून कोणत्या कारणावरुन झाला याचा तपास मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के करत आहेत.

Web Title: Solapur news murder in Pandharpur