'तो' मृतदेह अनुराधाच्या प्रियकराचाच

हुकूम  मुलाणी
रविवार, 9 डिसेंबर 2018

'येथे आढळून आलेला मृतदेह पती श्रीशैल्य बिराजदारचा आहे. आमचा तपास चालू आहे,' असे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी सांगितले.

मंगळवेढा : तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील डॉ. अनुराधा बिराजदार हिचा सावत्र आई-वडिलांनी विषारी औषध पाजून खून करून तिचा ज्या ठिकाणी अंत्यविधी केला त्या जागी एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. तो मृतदेह अनुराधाचा प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदारचा असू शकतो अशी चर्चा घटनास्थळी सुरू आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, 'हा मृतदेह पती श्रीशैल्य बिराजदारचा आहे. आमचा तपास चालू आहे,' असे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी सांगितले.

मृतदेहाजवळ जाण्यास कोणीही धजावत नसून या परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली असून पोलीस निरीक्षक अनिल गाडे पथकासह दाखल झाले असून, श्वान पथकाला पाचारण केले असून पोलिस तपासानंतर नेमका मृतदेह कुणाचा आणि मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

या घटनेची हकीकत अशी की येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव विठ्ठल बिराजदार यांची वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी अनुराधा बिराजदार हिने शेतातील सालगडी असलेल्याचा मुलगा श्रीशैल्य बिराजदार हिच्याशी विजापूर येथे विवाह केला. हा विवाह वडिंलास न रुचल्यामुळे वडिलांनी सिंदगी येथील वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून सलगर बुद्रुक येथे आणून मारून टाकले. या प्रकरणी वडील विठठल बिराजदार व सावत्र आईस सध्या पोलिसांच्या ताब्यात असताना श्रीशैल्य बिराजदारने आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रारही पोलीस अधीक्षकांकडे केली होती. पण या युवकाच्या मृतदेहामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी  पोलिस निरीक्षक अनिल गाडे आपल्या पथकासह दाखल झाले.

 

Web Title: solapur news murder shrishailya birajdar found dead