दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचा सिद्धेश्‍वरांच्या नावाला पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज यांचे नाव द्यावे, असा एकमुखी ठराव दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचा पाठिंबा हा सिद्धेश्‍वर महाराजांच्या नावासाठी असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांनी दिली. 

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज यांचे नाव द्यावे, असा एकमुखी ठराव दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचा पाठिंबा हा सिद्धेश्‍वर महाराजांच्या नावासाठी असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांनी दिली. 

सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने यापूर्वीच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍याने मात्र स्वतंत्र भूमिका घेतली आहे. या बैठकीला उपाध्यक्ष रेवणसिद्ध व्हनमाने, महिलाध्यक्षा संगम्मा सगरे, दत्तात्रेय घोडके, अप्पाराव कोरे, प्रवीण राठोड, अक्षय शिंदे, अख्तर पटेल, रामय्या स्वामी, बिपिन करजोळे, चंद्रशेखर भरले, मिलिंद मुळे, श्रीकांत बगले, शिवानंद बंडे, मलकारसिद्ध पुजारी, रियाज शेख, रवी घोडके, शरणप्पा फुलारी, बाबूराव रामपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सिद्धेश्‍वर विद्यापीठ नामकरणास पाठिंबा असल्याबाबतचे पत्र दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने अखिल भारतीय शिवा वीरशैव युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांना देण्यात आल्याचेही बगले यांनी सांगितले. 

"नगरचे नाव अहिल्यादेवीनगर करा' 
अध्यक्ष बगले म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील धनगर समाज व लिंगायत समाज गुण्यागोविंदाने राहात असताना राज्यातील भाजप सरकारने धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारने हे आश्‍वासन पाळले नसल्याचा आरोपही बगले यांनी केला आहे. नगर जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता अहिल्यादेवीनगर नामकरण करण्यास दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचेही बगले यांनी म्हटले आहे.

Web Title: solapur news ncp