'अमृता वहिनी हाय हाय'च्या घोषणा; राष्ट्रवादीची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

पोलिसांनी अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी जाऊ न दिल्याने संतप्त महिला कार्यकर्त्यांनी अमृता वहिनी हाय हाय च्या घोषणा दिल्या.

सोलापूर : रामदेवबाबांच्या पतंजलीऐवजी महिला बचत गटाच्या उत्पादनांना सरकारी विक्री केंद्रात स्थान देण्याची मागणी करत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूरात निदर्शने करण्यात आली. महिला बचत गटांना आधार देण्याऐवजी सरकार पतंजलीला मदत करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी महिला आघाडीने अमृता वहिनी हाय हायच्या घोषना दिल्या.

सोलापुरात स्वामी रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत योग शिबिर आणि महिला मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. पतंजलीच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळवून देणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेवबाबांच्या पतंजलीऐवजी महिला बचत गटाचे उत्पादने सरकारी विक्री केंद्रात विक्रीस ठेवण्यासाठी स्थान द्यावे आणि खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.

पोलिसांनी अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी जाऊ न दिल्याने संतप्त महिला कार्यकर्त्यांनी अमृता वहिनी हाय हाय च्या घोषणा दिल्या.

Web Title: solapur news NCP agitation against Amruta Fadnavis