मोहोळ : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची तयारी पूर्ण

राजकुमार शहा
रविवार, 25 मार्च 2018

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण राज्यभर शासनाच्या विरोधात व विविध प्रश्नी या यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा सहा एप्रिल रोजी मोहोळ तालुक्यात येत असुन विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात केले आहे.

मोहोळ : राष्ट्रवादीच्या निघालेल्या हल्लाबोल यात्रेच्या मोहोळ तालुक्यातील स्वागताची तयारी पुर्ण झाली असून, नियोजनाबाबत व विविध समित्या गठीत करण्यासाठी अंतिम बैठकीचे मार्च अखेर आयोजन केल्याची माहिती मोहोळचे नगराध्यक्ष तथा जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली.

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण राज्यभर शासनाच्या विरोधात व विविध प्रश्नी या यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा सहा एप्रिल रोजी मोहोळ तालुक्यात येत असुन विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात केले आहे.

सध्या मोहोळ नगर परिषदेवर राष्ट्रवादीची सता आहे. मात्र नगरपरिषद स्थापनेपासुन आजतागायत नगरपरिषदेतील मुख्याधिकारी नगर अभियंता पाणी पुरवठा अभियंता व विद्युत आभियंता ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे मोहोळचा विकास खुंटला आहे यासाठी बारसकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. ही बाब अजित पवार यांच्या कानावर घालुन वैशिष्टपुर्ण व नगरोत्थान योजनेतुन शहर विकासासाठी दोन कोटीच्या निधीची मागणी करणार असल्याचे बारसकर यांनी सांगितले. 

यात्रेसमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत. तर तालुक्यातील जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील राष्ट्रवादीचे पं स समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, कृऊबा चे अध्यक्ष नागा साठे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Solapur news NCP hallabol agitation in Mohol