प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या 12 बड्या व्यापाऱ्यांना नोटीस 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 9 जानेवारी 2018

सोलापूर - पन्नास मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या पण नोंदणी न केलेल्या 12 बड्या व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटीस बजावली. नोंदणी करावी अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. 

नवीन कायद्यानुसार लॉन्ड्री, साडीविक्रेते, स्वीटमीट मार्ट, कापड व्यापारी, टेलर, बेकरी, दुकान, चादर शोरूम, इलेक्‍ट्रिक दुकान, सुपर मार्केटमधील व्यावसायिकांनी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे व उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिला आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे, प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. बी. टी. दुधभाते, अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष शिंदे, शहर नागरिक मंचचे सदस्य प्रा. डॉ. राजा ढेपे, अन्न व परवाना अधीक्षक अनिरुद्ध आराध्ये, अन्न निरीक्षक केदार गोटे, श्रीराम कुलकर्णी व महादेव शेरखाने यांच्या पथकाची या कारवाईसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक अचानक कोणत्याही दुकानात जाऊन तपासणी करणार आहे. बंदी असलेल्या तसेच शासनाने जाहीर केलेले निकष डावलून उत्पादन केलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येणार आहेत. 

नोटिसा बजावण्यात आलेले व्यावसायिक व संस्था 
राजेंद्र शिंगी (राजेंद्र स्वीट मार्ट), महेश ठाकरे (करुणा हॉटेल), बालाजी गाजूल (बालाजी व्हिविंग), अरुण म्याकल (शिवानी लेडीज टेलर), नित्यानंद पुलगम (पुलगम शोरूम), गोपाळ चिलका (चिलका शोरूम), एस. एन. चिलका (चिलका शोरूम व व्हिविंग), श्रीनिवास कौडकी (श्री टेलर्स), गणपत भोसले (नॅशनल लॉन्ड्री), अनविरप्पा मोटगी (आनंद हलवाई), दीपक मोटगी (अप्पा हलवाई), व्ही. आर. पवार (व्ही. आर. पवार साडी सेंटर) 

Web Title: solapur news notice to 12 big businessman for plastic bag use