पार्किंगच्या राखीव जागेत बाँडरायटर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

सोलापूर - शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये बेशिस्त पार्किंगचे दर्शन घडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा हीच स्थिती आहे. पार्किंगसाठी राखीव जागेत बाँडरायटर बसलेले असतात. पार्किंगच्या राखीव जागेत वाहने न लावता कोठेही रस्त्यात लावली जातात. 

यानिमित्ताने बाँड रायटर्सना बसण्यासाठी एखादी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. गर्दीच्या वेळी बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना चालण्यासाठी व इतर गाड्यांच्या रहदारीसाठी जागा राहत नाही. पार्किंग व्यवस्थेकडे लक्ष देणारा कोणताच कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांसाठी तीन ठिकाणी पार्किंगची सोय मोफत करण्यात आली आहे. मात्र येथे वाहने न लावता मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जातात. सिद्धेश्‍वर शाळेकडील बाजूस स्टेट बॅंक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखा, ब्रह्मदेवदादा माने सहकारी बॅंक तसेच समोरच्या बाजूस अनेक झेरॉक्‍सची दुकाने आहेत. बॅंक व झेरॉक्‍सच्या दुकानांमध्ये येणारे नागरिक वाहने बेशिस्त पद्धतीने रस्त्यातच लावतात. त्यामुळे या भागात सकाळपासूनच गोंधळ उडालेला असतो. 

दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी जिल्हाधिकारी कार्यालय व सेतू परिसरात वाढते. आगामी काळात बेशिस्त पार्किंगचा बंदोबस्त न केल्यास ही समस्या आणखी वाढेल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याबाबत कारवाई करावी व वाहनधारकांना शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

वाहने लावण्यासाठी पार्किंग जागा आहे. मात्र, आधीच खूप गाड्या या ठिकाणी लावलेल्या असतात. गर्दीमुळे वाहन काढण्यास अडचण होते म्हणून बाहेरच्या बाजूस वाहन लावून काम आटोपून निघून जातो. 
- संदीप जाधव,  रहिवासी, मडकी वस्ती

Web Title: solapur news parking Bond Reuters