बार्शी: सात वर्षांनंतर भरला पाथरी मध्यम प्रकल्प

सुदर्शन हांडे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

या तलावामुळे या संपूर्ण परिसरातील जनावराच्या तसेच शेतीच्या आणि या तलावावर असणाऱ्या विविध पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रश्न निकाली निघाला आहे. २०१० सालानंतर प्रथमच तलाव भरून सांडवा सुटला आहे. यामुळे उपसासिंचन, कॅनॉलद्वारे शिराळे,पाथरी, घारी, पिंपळगांव पा, पांगरी, झानपूर, ममदापूर, खामगांव आदी गावांतील शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे.

बार्शी : सात वर्षानंतर पाथरी मध्यम प्रकल्पातील सांडवा सुटल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. माजी मंत्री तथा आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते रविवार (ता. १७) सकाळी ११ वाजता जलपूजन करून प्रकल्प भरल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती युवराज काटे, प्रा.अशोक सावळे, जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत, पाथरीच्या सरपंच वैशाली पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद, शाखाधिकारी रविंद्र कुलकर्णी, माजी सरपंच नानासाहेब गायकवाड, निलकंठ शेळके, बाबा जाधव, संपत काळे, बापू गोरे, सुनिल चौधरी, समाधान चौधरी, शिवाजी काळे, नाना जगदाळे, धनवंत नाईकनवरे, धनवंत पाटील, ब्रह्मचारी गायकवाड, भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार सोपल म्हणाले, १९.९३ मीटर उंची आणि २०६९ मीटर लांबी व ४१९.४७ एमसीएफटी एवढी क्षमता असलेला हा जलाशय उत्तर बार्शी या ग्रामीण भागासाठी वरदान आहे. भूकंपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून या तलावाच्या मजबूतीकरणासाठी मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता हेावू शकल्यामुळे पाथरी तलावाची मजबुती यामध्ये भराव मजबूतीचे काम मोठया प्रमाणात झालेले आहे.

या तलावामुळे या संपूर्ण परिसरातील जनावराच्या तसेच शेतीच्या आणि या तलावावर असणाऱ्या विविध पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रश्न निकाली निघाला आहे. २०१० सालानंतर प्रथमच तलाव भरून सांडवा सुटला आहे. यामुळे उपसासिंचन, कॅनॉलद्वारे शिराळे,पाथरी, घारी, पिंपळगांव पा, पांगरी, झानपूर, ममदापूर, खामगांव आदी गावांतील शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच पिण्याचाही प्रश्न मिटला असून शेतकरी व ग्रामस्थ समाधानी असल्याचे सांगितले.

Web Title: Solapur news Pathri dam in Barshi