सोलापूर: ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

बार्शी शहर व परिसरात रविवारी दुपार पासून पाऊस पडत होता. या पावसाने रात्री सातपासून चांगलाच जोर पकडला होता. दुपारपासून मुसळधार पाऊस झाल्याने बार्शी-अगळगाव रस्त्यावर कॅन्सर रुग्णालयाजवळ असलेल्या ओढ्याला पाणी वाढले होते. रात्री १० नंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे दरोडा प्रतिबंधक पथक बार्शी-वैराग-पांगरी-वैराग भगत फिरते.

बार्शी : रविवारी बार्शी शहर व परिसरात दुपारपासून सुरु असलेल्या पावसामुळे बार्शी-अगळगाव रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरून पाणी वाहत होते. रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने सोलापूर ग्रामीण पोलिसांची व्हॅन ओढ्यावरून रस्त्याच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. 

बार्शी शहर व परिसरात रविवारी दुपार पासून पाऊस पडत होता. या पावसाने रात्री सातपासून चांगलाच जोर पकडला होता. दुपारपासून मुसळधार पाऊस झाल्याने बार्शी-अगळगाव रस्त्यावर कॅन्सर रुग्णालयाजवळ असलेल्या ओढ्याला पाणी वाढले होते. रात्री १० नंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे दरोडा प्रतिबंधक पथक बार्शी-वैराग-पांगरी-वैराग भगत फिरते. या पथकाची व्हॅन रात्री कॅन्सर रुग्णालया जवळील ओढ्यातून जात असताना चालकास पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ओढ्यात गेली.

तात्काळ गाडीतील पोलीस कर्मचारी गाडी बाहेर पडले. तर व्हॅन मोठी असल्याने व काहीवेळात पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. सकाळी पाण्याचा प्रवाह पूर्णतः कमी झाल्या नंतर पोलिस व्हॅन ओढ्यातून काढली असल्याची माहिती बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: Solapur news police van accident