यंत्रमाग कामगारांना दिवाळी साजरी करू द्या - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सोलापूर - कारखानदार आणि मालकांची एकत्र बैठक घेऊन यंत्रमागधारकांच्या संपावर तोडगा काढावा, कामगारांना दिवाळी आनंदात साजरी करू द्यावी, असे पत्र मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय श्रममंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. यंत्रमागधारक कामगारांच्या प्रश्‍नांबाबत मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे आणि मनसे प्रणीत जिल्हा यंत्रमाग कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीधर गुडेली यांनी राज ठाकरे यांची मंगळवारी (ता. 17) भेट घेतली. त्यानंतर श्री. ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले. 

सोमवारी (ता. 16) जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रमाग कामगार आणि कारखानदारांची बैठक झाली. ठोस आश्‍वासन दिल्याशिवाय कारखाने चालू करणार नाही, असा निर्णय कारखानदारांनी घेतला. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्या वेळी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे आणि कामगार संघटनेने हा विषय राज ठाकरे यांच्यापर्यंत पोचवण्याचा निर्णय घेत सोमवारी रात्री मुंबई गाठली. मंगळवारी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या प्रश्‍नी दोघांची बैठक घेऊन तोडगा काढावा, कामगारांना जास्त वेठीस न धरता त्यांची दिवाळी आनंदी साजरी करावी, असे पत्र त्यांनी केंद्रीय श्रममंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्यासह सोमशंकर पासकंटी, अप्पा करचे, सुरेश टेळे, शशिकांत पाटील, नागनाथ केदारी, नागेश वडनाल आदी उपस्थित होते.

Web Title: solapur news Raj Thackeray