'जलयुक्त शिवार अभियानामुळे समृद्धी'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

सोलापूर - जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात समृद्धी येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे. या अभियानामुळे राज्याचा ग्रामीण भाग दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. 

सोलापूर - जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात समृद्धी येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे. या अभियानामुळे राज्याचा ग्रामीण भाग दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. 

पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांसाठीच्या जलयुक्त शिवार अभियानातील राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारांचे वितरण आज त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी शिंदे बोलत होते. या वेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार विलास जगताप, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी उपस्थित होते. 

प्रा. शिंदे म्हणाले, ""जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग असल्यामुळे हे अभियान केवळ शासनाचे न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. लोकचळवळीमुळे अभियानातील कामासाठी लोकांनी पैसा उभा केला. अनेक गावांत निवृत्त झालेल्या लोकांनी निवृत्तिवेतनाचे पैसे दिले. लहान मुलांनी वाढदिवसाला मिळालेले पैसे जयलुक्त शिवारच्या कामासाठी दिले. यावरून या अभियानाला लोकांनी आपले मानले असल्याचे स्पष्ट होते. शासकीय अभियानापासून लोकचळवळीत रूपांतर होण्यात प्रसार माध्यमांचा मोलाचा वाटा आहे.'' 

राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातील कार्यक्रमामुळे अनेक गावात चांगली कामे झाली आहेत. अनेक गावांतील दूध आणि शेतीचे उत्पादन वाढले. अभियान समृद्धीचे दूत ठरले आहे.'' 

या वेळी विभाग आणि जिल्हा स्तरावर विजेत्या ठरलेल्या जिल्हा, गाव आणि तालुक्‍यांना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारांसाठी असणाऱ्या पुरस्काराने पाचही जिल्ह्यांतील विजेत्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांचेही या वेळी कौतुक झाले. त्याचबरोबर तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. 

विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी आभार मानले. प्रकल्प संचालक रवींद्र माने यांनी संयोजन केले.

Web Title: solapur news ram shinde jalyukt shivar abhiyan