"सकाळ-ऍग्रोवन'च्या द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे उद्या सोलापुरात उदघाटन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सोलापूर - "सकाळ-ऍग्रोवन'तर्फे द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. 15) सकाळी दहा वाजता शहरातील मध्यवर्ती अशा होम मैदानावर शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन आहे. शुक्रवार ते रविवार (ता. 17) असे तीन दिवस प्रदर्शन सुरू राहणार आहे. कृषी क्षेत्रातील विविध नामवंत कंपन्यांचा सहभाग आणि द्राक्ष, डाळिंबावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर परिसंवाद प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. 

गेल्यावर्षीही सोलापुरात प्रदर्शन भरले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यंदाही शुक्रवारपासून सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहता येईल. ट्रॅक्‍टर, ब्लोअर, ड्रिप इरिगेशन, टिश्‍युकल्चर, फर्टिलायझर्स, पेस्टिसाईडस्‌, बायोफर्टिलायझर, कीडनाशके, वनस्पतीवाढ नियंत्रके, मोबाईल टेक्‍नॉलॉजी यांसारख्या शेतीतल्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे नेणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा आविष्कार या प्रदर्शनात पाहायला मिळेल. त्याशिवाय शेतकरी आणि तज्ज्ञांचे द्राक्ष-डाळिंबावर मार्गदर्शनपर परिसंवादही होतील. त्यात शुक्रवारी (ता. 15) पहिल्या दिवशी उद्‌घाटन सत्रानंतर दुपारी दोन वाजता प्रगतशील शेतकरी मारुती चव्हाण यांचे "द्राक्ष उत्पादनासाठी ऑक्‍टोबर छाटणीनंतरचे नियोजन' या विषयावर तर दुपारी चार वाजता राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा या "डाळिंबावरील कीड-रोग व्यवस्थापना'वर बोलतील. शनिवारी (ता. 16) दुपारी बारा वाजता बारामती केव्हिकेचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांचे "डाळिंबाचे सेंद्रिय व जैविक पद्धतीने व्यवस्थापन व उत्पादनवाढीसाठी मधमाशी महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रगतशील शेतकरी अतुल बाबर यांचे "निर्यातक्षम द्राक्ष व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन होईल. रविवारी (ता. 17) डॉ. विनय सुपे (सहायक संचालक, रिसर्च एनएआरपी, पुणे) यांचे "दर्जेदार डाळिंब उत्पादन सुधारित तंत्र व तेलकट डाग रोगाचे नियंत्रण' या विषयावर मार्गदर्शन होईल.

Web Title: solapur news sakal agrowon Grape-pomegranate exhibition