मंगळवेढा - अवैध वाळू उपशावर धाड

हुकूम मुलाणी
रविवार, 11 मार्च 2018

महसूल विभागाचा छुपा आशीर्वाद असल्यामुळे रात्र दिवस वाळू नदी पात्रातून करून नदी परिसरात साठा करून विकली जात होती व अवैध ओव्हरलोड वाळू मुळे नदीकाठची व ग्रामीण भागातील रस्ते खराड होवून खडडे पडले. तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफिया विरोधात कारवाई करावी यासाठी उपोषण,आंदोलन महसूल विभागावर करण्यात आले होते

मंगळवेढा  - पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या पथकांनी तालुक्यातील तांडोर येथील अवैध वाळू उपशावर पहाटे धाड टाकून सुमारे वाळू उपशा करणारी वाहने  जप्त केली असून पोलीसाची कारवाई सुरूच आहे.तालुक्यात अवैध वाळू उपशा विरोधात जिल्हा पथकाची सिद्धापूर नंतर दुसरी मोठी कार्यवाही आहे.

या कारवाईत वाळू माफीयांकडून 18 ट्रॅक्टर, 4 जी.सी.बी 13. ट्रक आणि वाहनातील वाळूसाठा जप्त केला असून अजूनही वाहन व वाळूची मोजदाद सुरू आहे.कारवाईसाठी पोलीस खासगी वाहनातून वेशांतर करून पहाटेच आल्यामुळे कुणालाही यांचा अंदाज आला नाही पोलीस असल्याचे लक्षात येताच नदीपात्रातील वाळूने भरलेले  ट्रॅक्टर ,ट्रक व जे.सी.बी नदीपात्रात सोडून त्यांनी पळून लगत ऊसाचा आसरा घेतला.

महसूल विभागाचा छुपा आशीर्वाद असल्यामुळे रात्र दिवस वाळू नदी पात्रातून करून नदी परिसरात साठा करून विकली जात होती व अवैध ओव्हरलोड वाळू मुळे नदीकाठची व ग्रामीण भागातील रस्ते खराड होवून खडडे पडले. तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफिया विरोधात कारवाई करावी यासाठी उपोषण,आंदोलन महसूल विभागावर करण्यात आले होते. मात्र वाळू उपशाला यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या पथकाने पहाटेच येवून ही  धडक कारवाई केली .या  मोठ्या कारवाईने अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहेत.

वाळू वाहतूक करणारे शासकीय यंत्रणेपेक्षा दक्ष असतात त्यांनी अधिकाय्राचे निवासस्थान व शासकीय कार्यालयाच्या परिसर माचणूर चौक,बालाजी नगर,बोराळे,बोराळे नाका या ठिकाणी आपले खबरे ठेवून अधिकार्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात अधिकारी कार्यालयाच्या बाहेर पडले लगेच सुचना देवून वाहने कधी मुख्य तर कधी ग्रामीण भागातील रस्त्याने नेण्यासाठी सांगतात  पण जिल्हा पथकाने या खबय्रालाही चकवा दिला

Web Title: solapur news sand mining