शेतकरी संपामुळे तीन लाख लिटर दुधाची विक्री नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

महूद - शेतकऱ्यांच्या संपाला महूद परिसरासह संपूर्ण सांगोला तालुक्‍यात मोठा प्रतिसाद लाभला. यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या सांगोला तालुक्‍यातील सुमारे तीन लाख लिटर दूध बाहेर विक्रीस गेले नाही. यामुळे सुमारे एक कोटी रुपयांची तालुक्‍यातील उलाढाल आज ठप्प झाली आहे.

महूद - शेतकऱ्यांच्या संपाला महूद परिसरासह संपूर्ण सांगोला तालुक्‍यात मोठा प्रतिसाद लाभला. यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या सांगोला तालुक्‍यातील सुमारे तीन लाख लिटर दूध बाहेर विक्रीस गेले नाही. यामुळे सुमारे एक कोटी रुपयांची तालुक्‍यातील उलाढाल आज ठप्प झाली आहे.

शेतकऱ्यांच्या संपाला महूद, महीम, खिलारवाडी, चिकमहूद, वाकी-शिवणे यासह संपूर्ण सांगोला तालुक्‍यात मोठा प्रतिसाद लाभला.शेतकऱ्यांच्या संपात सहभागी होण्याविषयी गावोगावी चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता. सकाळी तरुण दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दूध संस्थांना दूध न वाढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आणलेले दूध शेतकऱ्यांनी बेघर वसाहतीमधील गरीब कुटुंबांना मोफत वाटले. तर काही शेतकऱ्यांनी हे दूध चक्क डाळिंबाच्या रोपांना घातले आहे. महूद येथील कासाळगंगा दूध संस्थेचे दैनंदिन दूध संकलन १४ हजार लिटर असून या संस्थेसह महूद येथील इतर सुमारे नऊ संस्थांचे दैनंदिन संकलन सुमारे २५ ते ३० हजार लिटर आहे. मात्र, आज एकही लिटर संकलन येथे झाले नाही. जिल्हा दूध संघास सर्वाधिक दूध पुरवठा करणारी संस्था म्हणून महीम येथील गुरुदत्त दूध संस्थेची ओळख आहे. या संस्थेसह महीम येथील सहा संस्थांचे दैनंदिन दूध संकलन सुमारे १६ हजार लिटर आहे. मात्र, आज महीम येथे एक लिटरही दूध संकलन झाले नाही. संपूर्ण सांगोला तालुक्‍यात कोठेही दूध संकलन न झाल्याने सुमारे तीन लाख लिटर दूध बाहेर विक्रीस गेले नाही. यामुळे सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

महूद येथील एकाही दूध उत्पादकाने संस्थेकडे दूध आणले नाही. अनेकांनी घरी खवा बनविला. काहींनी दुधाचे मोफत वाटप केले. 
- मोहन खबाले, कासाळगंगा दूध संस्था, महूद

Web Title: solapur news sangola news milk farmer strike