सोलापुरातही ब्लीड विदाऊट टॅक्‍सची मोहीम; ऑनलाइन मोहिमेला प्रतिसाद

शीतलकुमार कांबळे
शनिवार, 15 जुलै 2017

सोलापूर : महिलांच्या आयुष्यातील आवश्‍यक वस्तू म्हणून सॅनिटरी नॅपकिनकडे पाहिले जाते. या सॅनिटरी नॅपकिनवर सरकारने 12 टक्के जीएसटी लावला आहे. या विरोधात देशभर ब्लीड विदाऊट टॅक्‍स व ब्लीड ब्लीड विदाऊट फिअर ही ऑनलाइन मोहीम राबविली जात आहे. याचाच भाग म्हणून एसएफआयतर्फे (स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया) सोलापूर जिल्ह्यामध्ये जागृती करण्यात आले.

शासनाने महिला व मुलींच्या आरोग्याला प्राथमिकता देऊन शाळा, महाविद्यालय , विद्यापीठे, वसतीगृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स सहज व स्वस्तात उपलब्धव्हावे यासाठी सॅनिटरी पॅडच्या मशिन्स बसवाव्यात. सॅनिटरी नॅपकिन ही स्त्रियांसाठीची मूलभूत गरज आहे. त्यापासून तिला दूर न ठेवता तिला ते सहज व स्वस्त कसे उपलब्ध होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. फक्त आणि फक्त तेव्हाच तिचा हा मासिक पाळीचा खडतर आणि त्रासदायक प्रवास थोडासा का होईना सोपा व सुखकर होऊ शकेल. अशी मागणी या मोहिमेतून करण्यात येत आहे.

अर्थमंत्र्यांना पाठविणार सॅनिटरी नॅपकिन
शासनाने घेतलेल्या सॅनिटरी नॅपकिन वरील धोरणानंतर अनेक विद्यार्थी संघटना, महिला संघटना सामाजिक संघटनांनी या विरोधात आंदोलनाची मोहीम सुरू केली. "ब्लीड विदाऊट टॅक्‍स" असे नॅपकिनवर लिहून अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. सरकारने या मोहिमेची दखल घेऊन सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करावे असा या मागचा उद्देश आहे.

महिलांच्या मासिक पाळीवर मुले-मुली कॉलेज कॅम्पसमध्ये मोकळेपणाने बोलू लागले आहेत. सॅनिटरी नॅपकिन करमुक्त व्हायला हवेत अशी मागणी मोठया प्रमाणात केली जात आहे. मात्र आजही सरकारने महिलांच्या आरोग्याला प्राथमिकता देण्याऐवजी सौभाग्याच्या लेण्याला अधिक महत्त्व दिले आहे. मासिक पाळीमध्ये अस्वच्छ कापडाच्या वापरामुळे अनेक संसर्गजन्य रोग होण्याची शक्‍यता असते आणि त्यामुळे महिलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
- पूजा कांबळे, राज्य समिती सदस्य, एसएफआय.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: solapur news sanitary napkins gst and online