मनातले सांगण्यासाठी 'सराहा'चा सहारा फेसबुकवर लोकप्रिय होतोय नवा ट्रेंड

शीतलकुमार कांबळे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

सोलापूर : आपल्यांना मनातलं काही तरी सांगायचं, पण नातं तुटण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत नाव न सांगता एखादी गोष्ट सांगायला मिळाली तर किती भारी होईल. ही संधी "सराहा'च्या माध्यमातून फेसबुक मिळवून देत आहे. अगदी थोड्या कालावधीत या "सराहा'ला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

सोलापूर : आपल्यांना मनातलं काही तरी सांगायचं, पण नातं तुटण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत नाव न सांगता एखादी गोष्ट सांगायला मिळाली तर किती भारी होईल. ही संधी "सराहा'च्या माध्यमातून फेसबुक मिळवून देत आहे. अगदी थोड्या कालावधीत या "सराहा'ला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

"सराहा' (sarahah.com) हा ट्रेंड फेसबुकवर सुरू आहे. या ट्रेंडमध्ये कुणीतरी व्यक्त केलेले मत कुणी व्यक्त केले आहे, हे कळत नाही. ही "सराहा'ची सर्वांत सकारात्मक बाब आहे. याचा वापर करून सध्या महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण, कार्यालयीन कर्मचारी आपल्या मित्र-मैत्रिणींना आपल्याविषयी काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काहींनी आपल्या चुका समजावून घेण्यासाठी तर काही फक्त गंमत म्हणून या ट्रेंडचा वापर करीत आहेत. सध्या फेसबुकवर या ट्रेंडने तुफान लोकप्रियता मिळविली आहे.

"सराहा' म्हणजे काय?
"सराहा' हा अरेबिक शब्द असून, याचा अर्थ प्रामाणिकपणा असा होतो. या अर्थामुळेच सोशल मीडियावर "सराह' या ऑनलाइन मेसेजिंग ऍपचा वापर का केला जातो हे समजते. आपले नाव, प्रोफाइल गुप्त ठेवून संबंधित व्यक्तीविषयी आपण भावना व्यक्त करू शकतो. "सराहा'च्या ऍपला गुगल प्ले आणि ऍप स्टोअरवर सध्या सर्वाधिक पसंती मिळत आहे.

"सराहा' हे ऍप खूप अप्रतिम आहे. आपल्याविषयी दुसऱ्यांना काय वाटते हे जाणून घेणे हा अनुभव काही वेगळाच आहे. मला "सराहा'च्या माध्यमातून खूप जणांचे मेसेज आले. स्वत:तील चुका सुधारण्याला यातून वाव मिळू शकतो.
- विकास वाघमारे

निनावी पत्र पाठविण्यासारखा हा ट्रेंड आहे. फरक एवढाच की कितीही प्रयत्न केले तरी मेसेज कुणी पाठविला हे कळत नाही. जसा या ट्रेंडचा फायदा तसा तोटाही आहे. एखाद्याविषयी मत व्यक्त करताना काही लोक पायरी सोडून काहीही मेसेज पाठवू शकतात.
- सत्यजित वाघमोडे

Web Title: solapur news sarahah and facebook