दहापेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सोलापूर जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रत्येक तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय कुठे करता येईल, याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मागितली आहे. 

जिल्हा परिषदेच्या मागील महिन्यात झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत 20 पेक्षा कमी पट असलेल्या किंवा काठावर पट असलेल्या शाळेतील शिक्षक कमी करून ज्या शाळेमध्ये जास्त पट आहे, पण त्याठिकाणी शिक्षकाचे पद रिक्त आहे, अशा ठिकाणी त्या शिक्षकाची नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दहापेक्षा कमी पटाच्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते त्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी 18 ऑगस्ट गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन अशा शाळांची माहिती मागितली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी कमी असल्यामुळे शाळा बंद करायची झाल्यास त्या शाळेतील विद्यार्थ्यांची सोय नजीकच्या शाळेत कशा पद्धतीने करता येईल, याच्या शिफारशीसह अहवाल देण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

प्रत्येक मूल शिकले पाहिजे ही शासनाची संकल्पना आहे. मात्र, त्याला हरताळ फासत दहा पटाच्या आतील शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये 10 पटाच्या आतील शाळा बंद करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. आता नव्याने ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. 

34 शाळांचा समावेश 
सोलापूर जिल्ह्यात दहापेक्षा कमी पट असलेल्य 34 शाळा आहेत. त्याचबरोबर 20 पेक्षा कमी पट असलेल्या शाळांची संख्या 189 एवढी आहे. समितीमध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर 34 शाळा बंद होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: solapur news school