शेटे यांनी स्वखर्चाने सुरू केले 'गो पालन सेवा केंद्र'

nandikeshwar-cow.
nandikeshwar-cow.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) - दुध, शेण, गोमुत्र, असे सारे भरभरून देणारी गाय दुध देईनाशी झाली की, तिला कसायच्या दावणीला बांधले जाते. अशा गोमातांना आधार देण्यासाठी माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील प्राध्यापक विजयकुमार शेटे पुढे सरसावले असुन, त्यांनी कसायाच्या तावडीतुन सोडवलेल्या गाईंना आश्रय देण्यासाठी माळावर असलेल्या स्वतःच्या शेतात स्वखर्चाने 'गो पालन सेवा केंद्र' सुरू केले आहे. सध्या येथे २५ देशी गायींचे पालन व संगोपन केले जात आहे.

कसायाच्या तावडीतून सुटका करून आणलेल्या गाईच्या संगोपन व पालनपोषण करण्यासाठी प्राध्यापक शेटे यांनी स्वखर्चाने स्वतःच्या शेतात 'नंदिकेश्वर गो पालन व सेवा केंद्र' या नावाने गोशाळेची उभारणी केली आहे. श्री शेटे यांना लहानपणापासून शेतीची व पाळीव प्राण्यांची आवड होती. शेतकर्यांच्या गोठ्यात गाईची कमी होत असलेली संख्या व गाईची होत असलेली कत्तल याबद्दल त्यांना मनात खंत वाटयाची. त्यामुळे त्यांनी निश्चय करून गोशाळेची स्थापना केली. त्यांच्या गोशाळेत असणाऱ्या २५ गाईचे संगोपन व पालनपोषण करण्यासाठी दोन जोडप्याची तेथे व्यवस्था करण्यात आली आहे. गाईसाठी लागणारा चारा ते स्वतःच्या शेतातच घेतात. तसेच १० ते १५ दिवसातुन पशु वैद्यकीय डॉक्टरांकडुन सर्व गाईच्या आरोग्याची तपासणी करतात. साधारणपणे महिन्याला त्यांना ३० ते ३५ हजार रूपये खर्च येतो. 

या गोशाळेत त्यांनी विविध प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे. गोमुत्रा पासून विविध प्रकारची औषधे तयार केली जातात. म्हणून गोशाळेतील गोमुत्राची साठवणुक करण्यासाठी जमीनीलगत मोठा हौद तयार करण्यात आला आहे. गोमुत्रातून ते किटकनियत्रंण, अमृतकवच, फिनाईल, जीवामृत असे विवीध प्रकारचे प्रकल्प गोमुत्रा पासून राबवितात. तसेच शेणखतापासून गांडुळखत, कंपोस्टखतही तयार करतात. पाण्याची टंचाई व चाऱ्याचा तुटवडा पडत असताना देखील प्राध्यापक विजयकुमार शेटे यांनी २५ गायांचे सुरू ठेवलेले संगोपन व पालनपोषण निश्चितच प्रेरणादायी व आदर्शवत आहे. त्यांच्या या गोशाळेला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन कौतुक केले आहे.

कत्तलखान्याला देण्यापेक्षा गो शाळेत सोडा
गाईंचा साभांळ होत नसल्यास, कत्तलखान्याला गाई देण्यापेक्षा गोशाळेत आणुन सोडाव्यात. अथवा आम्हाला कळवावे आम्ही गाई गोशाळेत आणतो. तसेच वाहनात कत्तलखान्याला चालेल्या गाई दिसल्यास आमच्यांशी संपर्क साधावा. त्यावर कायदेशीर कारवाई करू असे आवाहन नंदिकेश्वर 'गो पालन व सेवा' केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.  

गोशाळेत असलेल्या सर्व देशी गाई असुन, यात अजुन १५ ते २० गाईची संख्या लवकरच वाढविणार आहे. गोमुत्र, शेणखत यापासून नाविन्यपूर्ण वेगळे उपक्रम राबवणार आहोत.
विजयकुमार शेटे -  संस्थापक 'नंदिकेश्वर गो पालन व सेवा केंद्र'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com