"सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यासाठी नाशिकच्या कंपनीची निविदा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सोलापूर - येथील सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी नाशिक येथील विहान कंस्ट्रकशन कंपनीची एकमेव निविदा दाखल झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय सोपस्कार उरकून महापालिका प्रशासनाने पाडकामाची तयारी सुरु केली आहे. 

सोलापूर - येथील सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी नाशिक येथील विहान कंस्ट्रकशन कंपनीची एकमेव निविदा दाखल झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय सोपस्कार उरकून महापालिका प्रशासनाने पाडकामाची तयारी सुरु केली आहे. 

सोलापूर विमानतळावरून विमान सेवा करण्यास सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य शासनानेच ही चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचे आदेश दिले. मात्र त्याची कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, हेलिपॅडच्या परिसरात उभारलेल्या खांबाला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा पंखा लागल्याने निलंग्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुर्घटना झाली. त्यानंतर पालिकेने चिमणी पाडण्यासाठी तातडीने निविदा काढली होती. पहिल्या तीन वेळेस कुणीही निविदा दाखल केली नव्हती. चौथ्यांदा नाशिक येथील कंपनीने निविदा दाखल केली आहे. 

पाडकामाचा खर्च शासन देणार 
ही चिमणी एम. एस. स्टील व कॉंक्रीट वापरून मिश्र पद्धतीने बांधण्यात आली आहे. ती पाडण्याची नोटीस महापालिकेने बजावली, मात्र त्यानुसार कार्यवाही न झाल्याने शासनानेच चिमणी पाडण्याचे आदेश दिले. पाडकामाचा खर्च शासन देणार आहे, असे सचिवांनी महापालिकेस कळविले आहे. 

Web Title: solapur news Siddheshwar Cooperative Factory