सिद्धेश्‍वर यात्रा शुक्रवारपासून सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

सोलापूर - नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना शुक्रवारी (ता. 12) 68 लिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करून सुरवात होणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी मंगळवारी दिली. यंदाही यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी एक कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

होम मैदानावरील यात्रेत 210 स्टॉल असणार आहेत. खेळणी आणि खाद्य पदार्थांच्या स्टॉलसोबतच यंदा डिस्नेलॅण्ड हे आकर्षण ठरणार आहे. यात्रेनिमित्त विजापूर रस्त्यावरील श्री रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरात पशुप्रदर्शन आणि विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत यात्रेत होम मैदानावर कृषी प्रदर्शन भरणार आहे.

Web Title: solapur news Siddheshwar Yatra