"हर्र बोला हर्र'च्या जयघोषात सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

सोलापूर - "बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय'च्या जयघोषात शुक्रवारपासून सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वराच्या यात्रेला प्रारंभ झाला. सनई-चौघड्यांचा मंजुळ आवाज, बॅंजोवरील भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोशाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीने सोलापूरचे वातावरण भक्तिमय झाले. 

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला तैलाभिषेकाने (यन्नीमज्जन) आजपासून प्रारंभ झाला. 68 लिंगाना नंदिध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला. पांढऱ्या रंगाच्या बाराबंदीच्या पोशाखातील हजारो सिद्धेश्वर भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तैलाभिषेकासाठी गुरुवारी (ता.11) मध्यरात्रीच मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदिध्वजाला साज चढविण्यात आला. 

उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठात सकाळी मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदिध्वजांचे मानकरी व महापौर शोभा बनशेट्टी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे आदींच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. 

सोलापुरातील घराघरांमध्ये आज दिवसभर शेंगा-पोळी, शेंगा-चटणी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, दही असा सोलापुरी बेत असलेल्या जेवणावळी झाल्या. सोलापुरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने नंदीध्वजधारकांना चहा, पाणी, चिवडा व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. सिद्धेश्‍वराच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. 

Web Title: solapur news Siddheshwar Yatra