रमजानसाठी वीजेचे भारनियमन रद्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

सोलापूर - रमजाननिमित्त 28 मे ते 26 जूनपर्यंत राज्यातील भारनियमन रद्द करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यांची भारनियमनातून सुटका झाली आहे. 

भगीरथ, सिंगल फेज या सर्व वाहिन्यांवर अखंडित वीजपुरवठा करण्याच्या सूचना महावितरणने दिल्या आहेत. महावितरणच्यावतीने वर्गनिहाय भारनियमन केले जाते. ज्या भागातील थकबाकी जास्त आहे, वीज गळती जास्त आहे त्याठिकाणी जास्त वेळ भारनियमन केले जात आहे. म्हणजेच वर्गवारीनुसार इ, एफ, जी-1, जी-2, जी-3 यानुसार भारनियमन केले जात आहे. मात्र, रमजान कालावधीत त्या भागातील भारनियमनही रद्द केले आहे. अनेक लोक शेतामध्ये वस्त्यांवर राहतात. त्यांच्यासाठी शेतीपंपाशिवाय सिंगल फेजच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो. त्या फिडरवरील भारनियमनही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतात वस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांनाही 24 तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना महावितरणने दिल्या आहेत. 

Web Title: solapur news solapur Loading cancellation