संगनमताने केला कामगारहिताचा घात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विडी कामगारांना रोखीने मजुरी देण्याचे घोषित केले असताना कारखानदार अद्यापही रोखीने मजुरी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून शासन दरबारी तगादा लावला आहे. पण सोलापुरातल्या काही कामगार संघटनांनी कारखानदारांशी संगनमत करून कामगारांच्या विरोधात किमान वेतनाच्या करारावर सह्या केल्या, असा आरोप माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला.

दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालय येथून श्री. आडम यांच्या नेतृत्वाखाली लाल बावटा कामगार युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर कुरमय्या म्हेत्रे, फातिमा बेग, नरसम्मा यलगेटी, नलिनी कलबुर्गी, युसूफ शेख, अब्राहम कुमार, रंगप्पा मरेड्डी आदी उपस्थित होते. ॲड. एम. एच. शेख यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, सलीम मुल्ला, सुनंदा सूर्यवंशी, शकुंतला पाणीभाते, दत्ता चव्हाण, बाबू कोकणे, शंकर म्हेत्रे, मीरा कांबळे आदींसह कार्यकर्ते व असंख्य महिला विडी कामगार उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी कामगारांना रोखीने मजुरी, किमान वेतन २५३ रुपये देणे, छाट विड्या, गुल्ला कट्टा नावाने होणारी लूट थांबवावी आदी मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देऊन चर्चा केली. अनिल वासम यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Web Title: solapur news solapur MLA narsayya adam