महापालिकेला  ३२ लाखांचे अनुदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सोलापूर - नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा सुधारणा योजनेंतर्गत सोलापूर महापालिकेला ३२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी १३ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महापालिकेस उपलब्ध होणार आहेत. या रकमेतून दलित वस्त्यांमधील विकासकामे केली जाणार आहेत. 

या योजनेंतर्गत शासन ९० टक्के आणि लोकवर्गणी १० टक्के असा आकृतिबंध निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकांना ३२ लाख रुपये, अ वर्ग नगरपरिषदांना १५ लाख रुपये, ब वर्ग नगरपरिषदा १२ लाख रुपये, क वर्ग नगरपरिषदा १० लाख रुपये असे अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे.  त्यानुसार सोलापूर महापालिकेस ३२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १३ लाख ५० हजार ०९६ रुपये मंजूर झाले आहेत. 

या निधीतून कुमठे येथील सिद्धार्थ नगरात पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाणार आहे. या योजनेची किंमत १५ लाख रुपये असून, त्यापैकी शासनाने १३ लाख उपलब्ध केले आहेत. लोकवर्गणीचे एक लाख ५० हजार रुपये भरावे लागणार आहेत. याच धर्तीवर ग्रामीण भागासाठीही अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

नऊ कोटी ४१ लाख उत्पन्न
महापालिकेला मे महिन्यात नऊ कोटी ४१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी याच कालावधीत सात कोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळाले होते. स्थानिक संस्था करापोटी मिळालेले उत्पन्न तीन कोटी ३४ लाख इतके असून, त्या खालोखाल कर आकारणी विभागाकडून दोन कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Web Title: solapur news solapur municipal corporation