मानधन जमा होणार थेट नगरसेवकांच्या खात्यांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

सोलापूर - महापालिकेतील १०७ नगरसेवकांचे मानधन आता थेट त्यांच्या बॅंक खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे नगरसचिव कार्यालयात सुरू असलेली संबंधितांची दुकानदारी संपुष्टात येणार आहे. 

सुमारे ७२ माजी नगरसेवकांचे मानधन हडपण्याचा प्रयत्न नगरसचिव कार्यालयातून झाला होता. या संदर्भात ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर एकच खळबळ उडाली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित बसून धनादेश लिहिले व ते माजी नगरसेवकांना देण्याची कार्यवाही सुरू केली. 

दरम्यान, या बातमीची दखल आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतली. त्यांनी नगरसचिवांना बोलावून घेत या प्रकरणाची विचारणा केली. धनादेश देण्यास उशीर का झाला, याबाबतही विचारणा केली. त्या वेळी नगरसचिवांनी नेहमीप्रमाणे तांत्रिक उत्तरे दिली. झालेल्या प्रकारातील गांभीर्य डॉ. ढाकणे यांनी ओळखले आणि त्यांनी धनादेशाची पद्धत बंद करून नगरसेवकांच्या खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने मानधन जमा करण्याचे आदेश दिले. 

यापुढे मानधनापोटी नगरसेवकांना धनादेश देण्यात येणार नाहीत. त्यांच्या खात्यांवर थेट ऑनलाइन पद्धतीने मानधन जमा होईल. त्यानुसार तातडीने कार्यवाहीच्या सूचना नगरसचिवांना दिल्या आहेत. कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त

४० माजी नगरसेवकांना दिले धनादेश
‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी रातोरात ७१ माजी नगरसेवकांचे धनादेश तयार केले आणि त्यापैकी ४० जणांना त्यांच्या मानधनाचे धनादेश दिले. त्याच वेळी त्यांच्याकडून विशेष कार्यकारी अधिकारी पदाचे शिक्केही जमा करून घेतले. त्यामुळे नव्या नगरसेवकांना हे शिक्के देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: solapur news solapur municipal corporation