विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरणार

शीतलकुमार कांबळे 
गुरुवार, 1 जून 2017

सोलापूर - सोलापूर विद्यापीठात प्राध्यापकांची रिक्त असलेली रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची राज्यातील विद्यापीठांच्या कुलसचिवांची बैठक नुकतीच मुंबई येथे झाली. उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आयोजित बैठकीत कुलसचिवांनी विद्यापीठातील रिक्त पदांचा अहवाल सादर केला.

सोलापूर - सोलापूर विद्यापीठात प्राध्यापकांची रिक्त असलेली रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची राज्यातील विद्यापीठांच्या कुलसचिवांची बैठक नुकतीच मुंबई येथे झाली. उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आयोजित बैठकीत कुलसचिवांनी विद्यापीठातील रिक्त पदांचा अहवाल सादर केला.

राज्यातील बहुतांश विद्यापीठात प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी न दिल्याने रिक्त पदाची समस्या निर्माण झाली होती. याबाबत राज्यातील सर्वच विद्यापीठाने शासनाला कळविले होते. प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने रुसा (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) अंर्तगत निधी मिळण्यात अडचणी निर्माण होतात. या अडचणी सोडविण्यास मुंबईतील बैठकीत चर्चा करण्यात आली होती.

सोलापूर विद्यापीठात १० पदे रिक्त
सोलापूर विद्यापीठात प्राध्यापकांची दहा पदे रिक्त आहेत. यापैकी पाच पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. या पाच पदांसाठी शासनाने मंजुरीही दिली आहे. उर्वरित पाच पदांच्या भरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत सोलापूर विद्यापीठात रिक्त पदांची संख्या कमी आहे, अशी माहिती प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. पी. प्रभाकर यांनी दिली. 

भाषा संकुलाच्या अनुदानासाठी प्रयत्न
सोलापूर विद्यापीठात नव्याने भाषा संकुल सुरू होत आहे. या संकुलात मराठी, हिंदी व इंग्रजी या विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या अनुदानासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. भाषा संकुलास अनुदान मिळण्याची अपेक्षा असल्याचे प्रभारी कुलसचिव पी. प्रभाकर यांनी सांगितले.

नव्या कायद्यान्वये अशी असेल निवड समिती
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यांतर्गत निवड समितीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार निवड समितीवर कुलपतींचे दोन प्रतिनिधी, कुलगुरू, कुलसचिव, उच्च व तंत्रशिक्षण संचालक किंवा त्यांचा प्रतिनिधी, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विद्वत परिषदेने प्रस्तावित केलेल्या सहा तज्ञांपैकी तीन नावे व्यवस्थापन परिषदेला मंजूर करावी लागणार आहे. त्यात तीन सदस्यांना मिळून निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीतर्फेच यापुढे पदे भरली जाणार आहेत. ही समिती सप्टेंबर महिन्यापर्यंत स्थापन होण्याची शक्‍यता आहे.

रुसामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानसंदर्भात मुंबईत बैठक बोलाविण्यात आली होती. प्राध्यापकांची पदे रिक्त असल्यास रुसाचे अनुदान मिळवण्यास अडचणी येतात. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर विद्यापीठांत रिक्त पदांची संख्या जास्त आहे. सोलापूर विद्यापीठात फक्त १० पदे रिक्त असून पाच पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. तर उर्वरित पदांसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
   - प्रा. डॉ. पी. प्रभाकर, प्रभारी कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ.

Web Title: solapur news solapur university