मंगळवेढा येथे एसटी संपाने प्रवाशांचे दुसऱ्या दिवशीही हाल

हुकूम मुलाणी
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सरकार असंवेदनशील असून कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करता येत नसेेेल परिवहन मंत्री राजीनामा दिला पाहिजे. ऐन दिवाळी सणाला एसटीच्या संपामुळे बहिण भाऊ एकत्र येवू शकत नाहीत. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
- आमदार भारत भालके 

मंगळवेढा : ऐन दिवाळीत कर्मचाय्रानी आपल्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या संपामुळे मंगळवेढा आगाराचे दोन दिवसातील पंधरा लाखापेक्षा अधिक नुकसान झाले काल आणि बसस्थानकावर शुकशुकाट होता. संपामुळे सणासुदीच्या दिवसात प्रवासाचे मात्र हाल झाले. दरम्यान भरत भालके या संपातील कर्मचारीची भेट घेत परिवहन मंत्री रावते यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

१ एप्रिल २०१६ पासून सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील मिळणाऱ्या वेतनश्रेणी, वेतन, विविध भत्ते व सेवा सवलती लागू करण्यात याव्यात यासाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवेढा बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवसात मनस्ताप सहन करावा लागला. महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयांना सध्या सुट्या असल्याने नातेवाईकांकडे परगावी जाणाऱ्या व आलेल्या बसस्थानकावर अडकून पडावे लागले.

संपामुळे  पंढरपूर, सोलापूर, सांगोला, पुणे तर ग्रामीण भागातील हुन्रूर, शिरनांदगी, लवंगी, सिध्दापूर आदी मार्गावर फेेेऱ्या बंद होत्या. संपामुुळे जवळपास 15 लाखांपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाले. दिवाळीत महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट झाली. खासगी वाहनाधारकांकडून जादा दराने आकारणी करण्यात येत होती. आगारातील चालक 116 वाहक 110 वाहतूक नियंत्रक आणि तांत्रिक कर्मचारी 45 असे कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतन वाढीच्या दर चार वर्षांनी होणाऱ्या करार वेतन वाढीसाठी आणि इतर न्याय मागण्यासाठी संपावर गेला. एसटी कामावर संघटना सचिव नवनाथ जाधव की एसटी संपामुळे ग्रामीण जनतेचे हाल होणार याची कल्पना आहे. राज्याची जीवनहानी जगवायची असेल तर एस टी कर्मचाऱ्याला किमान पगार व सोयीसुविधा मिळाव्यात ही माफक अपेक्षा आहे.

सरकार असंवेदनशील असून कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करता येत नसेेेल परिवहन मंत्री राजीनामा दिला पाहिजे. ऐन दिवाळी सणाला एसटीच्या संपामुळे बहिण भाऊ एकत्र येवू शकत नाहीत. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
- आमदार भारत भालके 

Web Title: Solapur news ST employee strike in Mangalweda