एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी वाहन चालकांची दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सरकारने खासगी वाहनातून प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्याने त्याला पुस्ती मिळाली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संप सुरु झाल्यानंतर खासगी वाहनाने जाणे अनेक प्रवाशांनी पसंत केले. मात्र तिकीटाचे दर डबल केल्याने भुर्दंड सोसावा लागला.

सोलापूर : एेन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. याचा फायदा खासगी वाहन चालकांना झाला आहे.

सरकारने खासगी वाहनातून प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्याने त्याला पुस्ती मिळाली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संप सुरु झाल्यानंतर खासगी वाहनाने जाणे अनेक प्रवाशांनी पसंत केले. मात्र तिकीटाचे दर डबल केल्याने भुर्दंड सोसावा लागला.

सोलापूरपासून मोहळला १०० रुपये, पंढरपुरला २०० असे पैसे घेतले जात होते. नेहमी गजबजणार्या करमाळा स्टँडवर सकाळी शुकशुकाट होता. येथेही खासगी वाहनानी तिकीट दर वाढवले. जामखेडला ४० रुपये तिकीट असताना १०० रुपये तर टेंभुर्णी, जेऊरलाही जादा पैसे घेतले जात आहेत.

Web Title: Solapur news ST workers on strike