पुढील वर्षापासून "नरेंद्र मोदी सेवा' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे पुढील वर्षापासून "लोकमंगल'च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवा पुरस्कार देण्यात येतील, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. 

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे पुढील वर्षापासून "लोकमंगल'च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवा पुरस्कार देण्यात येतील, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. 

लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आज आदर्श शिक्षक, शाळा पुरस्काराचे वितरण किर्लोस्कर सभागृहामध्ये झाले, त्या वेळी सहकारमंत्री देशमुख यांनी ही घोषणा केली. या वेळी विश्‍वकोश मंडळाचे संचालक डॉ. दीपक घैसास, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, अविनाश महागावकर, पतसंस्थेचे अध्यक्ष गुरण्णा तेली, उपाध्यक्षा निर्मला भागवत, पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, देवानंद चिलवंत, ह. ना. जगताप, गजानन धरणे, अरविंद जोशी उपस्थित होते. 

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या गुरुजींनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी घालावीत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. भारुड यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची सूचना दिली. डॉ. घैसास यांनी सोलापूरचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर होण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

डॉ. घैसास म्हणाले, राज्याच्या संस्कृतीचा वारसा "लोकमंगल' जपत आहे. शिक्षकांनी स्वतःचे परीक्षण करणे गरजेचे आहे. सरस्वती व लक्ष्मी एकत्र नांदू शकतात. सध्याच्या युगात गुरुकुल जाऊन सायबरकुल सुरू झाले आहे. सोशल मीडियाचा वापर मुलांना करू द्यावा. मात्र, त्यातील काय घ्यावे, काय घेऊ नये, हे गुरुजींनी त्यांना शिकवावे. डॉ. भारुड म्हणाले, शिक्षकांपूर्वी विद्यार्थ्यांचा विचार होणे आवश्‍यक आहे. शिक्षकांनी सकारात्मक विचार करावा. समाजाने आपला मूळपणा जोपासणे गरजेचे आहे.

Web Title: solapur news subhash deshmukh