शहराध्यक्ष पदामुळे मला मेंटली टॉर्चरिंग केलं जायचं 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सोलापूर कॉंग्रेस शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने चर्चेचा चेहरा ठरलेले सुधीर खरटमल यांची मुलाखत... 

प्रश्‍न - असं काय झालं की तुम्ही तडकाफडकी राजीनामा दिला? 
उत्तर - 
मी संघटात्मक कार्य केलं. दहा, दहा वर्षं ज्यांनी काम केलं ते अशा वाईट स्थितीत पक्षाला सांभाळू शकले नसते, पण मी ते केलं. आता मरगळ सोडून सगळेजण काम करू लागलेत. पण, पक्षातील लोकांच्या त्रासामुळं मी पद सोडले. ज्यांची कपॅसिटी नाही ते अध्यक्ष होतो म्हणतात. काहीही चाललंय सगळं. काय सांगायचं तुम्हाला आता मी... जाऊद्या... साहेब तुम्हाला सांगतो... शहर कॉंग्रेस कमिटी चालवायला एक लाख रुपये खर्च येतो, एक लाख...! आहे का तेवढी ताकद कुणाच्यात... नाही... कुणातही नाही...! म्हणजे मला तर माहिती नाही. आता इच्छुकांची जी नावं मी ऐकतोय ना त्यांना स्वतःचं घर नीट सांभाळता येत नाही, ते पक्ष काय सांभाळणार ओ...! आता इच्छुक असलेल्या एकानं मला फसवलं पन्नास हजारांना. तो कसाकाय अध्यक्ष होऊ शकतो अं, तुम्हीच सांगा बरं...? अशी अनेक नावं आहेत की ज्यांची कपॅसिटीच नाही पक्ष सांभाळण्याची. हं, चाकोते, दिलीप माने होऊ शकतात. आता अध्यक्षाला कमीत कमी कोणताही कार्यक्रम करून घेण्यासाठी एक लाख रुपये खर्च करावा लागतोय ओ... काय सांगायचं तुम्हाला...? पूर्वी 30- 35 हजार भाडं येत होतं कार्यालय इमारतीचं. ते आता बंद आहे. कॉंग्रेस नगरसेवकांचे काही फंड्‌स यायचे, तेही बंद झालेत. नोटाबंदीमुळं पैशाचा बराच ओघ आटलाय. मी माझ्या पद्धतीनं, माझ्या खिशातून पैसे खर्च करून पक्ष चालवलाय. कुणाचा एक रुपया मी घेतला नाही, कोण तसं म्हंटलं तर मी त्याच्या एक रुपायाला दहा रुपये देईन. मला फायनान्शिअली काही भीती नाही, पण मला जो मानसिक त्रास होत होता तो नको होता, बस्स...! मेंटली टॉर्चरिंग नाही चालत मला. मला ते तुम्हाला अधिक सांगता येणार नाही इथं. तो माझ्या घरचा, ह्रदयातला विषय आहे, बस्स....! पण माझा जेव्हा बी फॉर्म घेतला तेव्हाच मी पक्ष सोडायला पाहिजे होता. 

नेमका कोणी अन्‌ काय त्रास दिला तुम्हाला? 
मला त्रास कोणी दिला हे मला तुम्हाला नाही सांगता येणार, पण माझंच चुकलं. मी नको इतका लोकांना लळा लावला. मला कुणाला दोष द्यायचा नाही, चूक माझी आहे. बस्स, मी जास्त प्रेम केलं. मी राजकारण्यासारखं वागायला पाहिजे होतं. मी तसं नाही वागलो. 

आता पुढे तुमची भूमिका काय असणार? 
आता ते ऑब्जर्व्हर राकेश सिन्हा आलेत, त्यांना जाऊन भेटणं माझं काम आहे. ते मी करणार आहे. नवा अध्यक्ष निवडेपर्यंत मी प्रभारी राहावं असं त्यांनी मला सुचवलं आहे, तर मी तसं करणार आहे. पहिल्याप्रमाणे पुढंही काम करणार मी. 

"एमआयएम' बाबत... 
"एमआयएम' आत्तासुद्धा माझ्या ताब्यात आहे ओ. मला फक्त विरोध होता प्रणिती शिंदेंचा, की त्यांना नाही बरोबर घ्यायचं म्हणून... पण मी आग्रही होतो. काय होतंय असं मी म्हणत होतो, पण नाही झालं... आता काय, शेवटी काय झालं... बजेटच्या वेळी त्यांना बरोबर घ्यावच लागलं ना... हेच जर आपण अगोदर केलो असतो तर... तौफीक, त्याचा भाऊ अरिफ रोज माझ्याबरोबर बसायचा-उठायचा... काय सांगू आता... ते मला म्हणायचे, सुधीरजी, आम्ही नाराज नाहीए, तुम्ही आहात आता म्हणजे आम्हीच अध्यक्ष असल्यासारखे आहोत. पण आमचे वरिष्ठ नेते लोक नको म्हणाले नं. अरिफभाई तर मला सारखं बोलायचे, म्हणायचे काही नं काही करा सुधीरजी... मी पण मुंबईत जाऊन सगळ्यांना भेटून आलो होतो, पण आता काय... एक दिवस तर असा आला की उद्या त्यांना पक्षात घ्यायचं, त्यांना हार, उपरणं घालयचे. ते आले असते ना तर आमचे 65 नगरसेवक झाले असते. त्या महेश कोठेंसाठी मला श्रीनिवासनी इतकं सांगितलं, रात्रंदिवस महेश कोठेंचा फोन होता, की बाबा बघा काही होतंय का ते... विशेष म्हणजे "अन्‌कंडिन्शल' ओ, बिचारे...! मला श्रीनिवास सारखा सांगायचा की "अन्‌कंडिन्शल' यायला तयार आहेत, सुधीरजी ते... बघा असं करू नका...! 

Web Title: solapur news sudhir kharatmal congress