सोलापूर महापालिकेत भाजपची गटबाजी कायम

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका बरखास्त करण्याचा इशारा देऊनही भाजपमधील गटबाजी कायम राहिली आहे. स्थायी समिती सदस्य निवडीवरुन या दोन्ही गटामध्ये पुन्हा फुट पडली आहे. यापुढील सभेत पालकमंत्री गटाचे ३५ नगरसेवक स्वतंत्र गट बसणार असल्याची घोषणा स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांनी केली.

स्थायी समिती सदस्यपदी पक्षाने सुचविलेल्या नावाऐवजी दुसरी नावे घुसविल्याच्या आरोप कोळी यांनी केला. पालकमंत्री गटाच्या ३५ नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार घातला. मात्र विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात असल्याने कोरमची अडचण झाली नाही. सभा संपल्यावर पालकमंत्री गटाने तीव्र संताप व्यक्त केला व पुढच्या सभेपासून स्वतंत्र बसण्याचा निर्णय घेतला.

Web Title: solapur news sulapur municipal bjp and politics