राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीतः सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

सोलापूरः राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत, असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. आज (शनिवार) दुपारी काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, "मते फुटली असे ज्यावेळी सांगितले जाते, त्यावेळी परिस्थिती उलट असते. आतापर्यंतच्या राष्ट्रपतींना झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर तेच दिसून येते. या निवडणुकीत "क्रॉस व्होटींग' झाल्याची शक्‍यता आहे. कारण अनेक पक्षांची आघाडी, युती आहे. त्यामुळे कुणी कुणाला मतदान केले हे लवकर समजणार नाही.''

हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी श्री. शिंदे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, "पक्ष जे सांगेल ते मी करणार आहे. यापूर्वी मी अखिल भारती काँग्रेस समितीचा सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी हिमाचल प्रदेशच्या दोन निवडणुकांची जबाबदारी होती. दोन्ही वेळेस पक्षाला यश मिळाले आहे. सोनिया गांधी, राहूल गांधी सांगतील ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.''

कर्जमाफीसंदर्भात बोलताना श्री. शिंदे म्हणाले, "शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आदेश अद्याप खालच्या यंत्रणेपर्यंत पोचलेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफी कधी मिळेल हे आताच सांगता येत नाही.''

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: solapur news sushilkumar shinde congress vote and president election