शासनाच्या योजनांचा संशोधनासाठी घ्यावा लाभ - डॉ. गणेश मंझा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

सोलापूर - यूजीसीसारख्या शासकीय संस्थेकडून संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी वापरून जास्तीत जास्त लोकांच्या गरजा पूर्ण करणारे संशोधन विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्‌घाटन करताना डॉ. मंझा बोलता होते. या वेळी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. किशोर इंगोले, डॉ. औदुंबर मस्के आदी उपस्थित होते.

मंझा म्हणाले, 'सध्या आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज आहे. असे संशोधन करताना सामान्य माणसाची गरज पाहणे महत्त्वाचे ठरते. यासाठी सामाजिक शास्त्र विभागाची मदत घेता येईल. "रिसर्च मेथॉडॉलॉजी' हा विषय वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही शिकविल्यास याचा मोठा फायदा होऊ शकतो.''

डॉ. घाटे म्हणाले, 'संशोधन करताना स्वतःच्या मनातील प्रश्‍न घेऊन पुढे न जाता. लोकांत मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. त्या पद्धतीने संशोधन केल्यास याचा फायदा सर्वांना होतो.''

डॉ. एच. पी. प्रसाद यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केलेल्या संशोधन निबंधांचे परीक्षण केले.

Web Title: solapur news Take advantage of government schemes for research