केवळ आयुक्तांच्या सहीमुळे गुरुजींचा थकला पगार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

सोलापूर - पगाराच्या आदेशावर आयुक्तांची स्वाक्षरी न झाल्याने महापालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार अडकला आहे. या संदर्भात शिक्षकांच्या प्रतिनिधींनी महापौर शोभा बनशेट्टी यांना निवेदन दिले. त्यांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. 

महापौर बनशेट्टी यांनी शुक्रवारी दुपारी अचानकपणे शिक्षण मंडळास भेट दिली. तेथील कामकाजाची पाहणी केली. यापूर्वी पगाराच्या आदेशावर सही करण्याचे अधिकार सभापती आणि प्रशासनाधिकारी यांना होते. मात्र, सरकारने सभापतींऐवजी हा अधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. आयुक्त सध्या रजेवर असल्याने आदेशावर स्वाक्षरी होऊ शकली नाही. त्यामुळे पगार थकला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याच्या सूचना आयुक्त करतील. शाळा सुरू झाल्यावर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे, असेही महापौर म्हणाल्या. या वेळी माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय गणपा, प्रशासनाधिकारी सुधा साळुंके, पर्यवेक्षक शिवाजी शेटे, मनीष बांगर, जगदीश काटेवाल उपस्थित होते.

Web Title: solapur news teacher solapur