चाचण्यांमुळे गुणवत्ता वाढण्यास मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सोलापूर - शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठीच राज्य सरकारने पायाभूत चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांमुळे शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यासाठी मदत झाली असल्याचे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलमध्ये आज तावडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत जलप्रतिज्ञा घेतली. त्या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना ते बोलत होते. या वेळी माजी आमदार सुधाकर परिचारक, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, माध्यमिक शिक्षक संचालक गंगाधर म्हमाणे, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी उपस्थित होते. तावडे म्हणाले, शाळेत विविध परीक्षा आणि चाचण्या घेतल्या जातात. पण शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची आवश्‍यकता वाटल्यामुळेच पायाभूत चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांमुळेच अनेक शाळांतील गुणवत्ता सुधारली आहे. त्याचबरोबर एका शाळेतील विद्यार्थी एका ठराविक क्षेत्रात कमकुवत असतील तर त्या शाळेत त्या क्षेत्रांचे मार्गदर्शन देता येणे शक्‍य होते. यामुळे त्या शाळेच्या गुणवत्तेचा दर्जा वाढण्यास मदत झाली आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी तावडे यांना विविध प्रश्‍न विचारले. त्याची उत्तरे तावडे यांनी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर जलप्रतिज्ञा घेतली. शाळेच्या स्थानिक अध्यक्ष स्वर्णलता भिशीकर यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: solapur news test education student vinod tawde