सोलापूरः टेंभुर्णीत गांजा पकडला; तीन आरोपी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

माढा (सोलापूर): टेंभुर्णी पोलिसांनी 46 किलो गांजा पकडला असून, या प्रकरणी तीन आरोपीना ताब्यात घेतले आहे.

रायगड वरून दोघेजण गांजा घेऊन येणार अशी माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली होती. अकलूज चौकात पोलिसांनी आज सकाळी सापळा रचला होता. तिघांकडून 46 किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची बाजारभावानुसार किंमत दोन लाख 34 हजार रुपये आहे.

दरम्यान, याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल बंडू शिंदे (रा. वेणेगाव ता. माढा), योगेंद्र राजेंद्र वीरकर (रा. रायगड) आणि स्वप्नील सुरज गायकवाड (रा. रायगड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. मगदूम करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: solapur news three areested for Hemp in tembhurni