एक लाख घरांसाठी दोन लाख "डस्टबीन' 

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 23 मे 2018

सोलापूर - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील एक लाख घरांना दोन लाख डस्टबीन देण्यात येणार आहेत. नागपूर येथील प्वालीमार कंपनी हे डबे पुरविणार आहे. 

सोलापूर - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील एक लाख घरांना दोन लाख डस्टबीन देण्यात येणार आहेत. नागपूर येथील प्वालीमार कंपनी हे डबे पुरविणार आहे. 

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 25 हजार डस्टबीन उपलब्ध होतील. निळ्या रंगाचा डबा हा ओल्या कचऱ्यासाठी तर हिरव्या रंगाचा डबा सुका कचरा साठविण्यासाठी असेल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत दुकानांसमोर ओला व सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र दोन डबे ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ओला व सुका कचरा साठविण्यासाठी महापालिका एक लाख कुटुंबीयांना डबे देणार आहे. ज्यांच्याकडे घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी नाही अशानाच डबे मिळतील. जे लोक कचऱ्याचे विलगीकरण करणार नाहीत, त्यांना सुरवातीला समज देण्यात येणार आहे. त्यानंतरही तीच भूमिका असेल तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सध्या कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या सकाळ आणि दुपारच्या सत्रात शहरात फिरतात. गोळा झालेला कचरा बुधवार पेठेतील डेपोत नेला जातो. तेथून एकत्रित झालेला कचरा तुळजापूर डेपोला घेऊन जातात. कचरा विल्हेवाटीचे नियोजन योग्य पद्धतीने केल्याने सध्या कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या नाही. 

स्वच्छ सोलापूरसाठी हे करता येईल 
1) ओला व सुका कचरा वेगळा ठेवावा. 
2) स्वयंपाकघरातील कचरा झाडांना खत म्हणून वापरता येईल. 
3) कचरामुक्तीसाठी महापालिकेला सहकार्य करावे. 
4) कचरा इतरत्र पडू न देण्याची शपथ घेऊन ती अमलात आणावी.

Web Title: solapur news Two lakh dustbin for one lakh homes