'उद्योगवर्धिनी'च्या मदतीमुळे रुग्ण क्षयमुक्तीच्या मार्गावर

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 24 मार्च 2018

जेवणाची केली व्यवस्था ; रोज 40 रुग्णांना देण्याचे नियोजन

सोलापूर: डॉक्‍टरांनी कर्तव्याला सामाजिक बांधिलकीची जोड दिली तर त्याचे किती सकारात्मक परिणाम होतात हे सोलापुरातील एका घटनेने दिसून आले. उपासमारीमुळे उपचार सोडलेल्या क्षयरुग्णाच्या जेवणाची सोयीसाठी डॉक्‍टरांनी केलेली धडपड आणि सामाजिक संस्थेने दिलेला प्रतिसाद यामुळे मरणाच्या दाढापर्यंत पोचलेला "हा'रुग्ण क्षयमुक्त होण्याची मार्गावर आहे.

महापालिकेच्या मदर तेरेसा पॉलिक्‍लिनीक समोरच असलेल्या होम मैदानावर एका पालीत कुटुंब रहाते. आई-वडील, मुलगा व नातू हे कुटुंबाचे सदस्य. पैकी मुलगा घरातला कर्ता. त्याच्या उत्पन्नावरच कुटुंबाच्या चरितार्थाची जबाबदारी. दुर्दैवाने त्याला क्षय झाला. उपचारासाठी त्यांनी पॉलिक्‍लिनीकमध्ये जाऊन संपर्क साधला आणि उपचार सुरु केले.

संबंधित रुग्ण डॉटस्‌ची औषधे घेण्यासाठी नियमित येत होता. काही कालावधीनंतर तो येण्याचे बंद झाले. त्यामुळे शहर क्षयरोग नियंत्रण विभागातील कार्यकर्त्यांनी त्याच्या घरी जाऊन माहिती घेतली. त्यावेळी या संपूर्ण कुटुंबाची उपासमार सुरु असल्याचे दिसून आले. जेवणाची सोय नसल्याने औषधे घेण्यास येत नसल्याचे त्या रुग्णाच्या वडिलाने सांगितले.

कार्यकर्त्यांनी ही घटना शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्या कानावर घातली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. कुलकर्णी यांनी तातडीने उद्योगवर्धिनी या सामाजिक संस्थेच्या प्रमुख चंद्रीका चौहान यांना माहिती दिली. वेळेवर जेवण मिळाले आणि उपचार झाले तर रुग्ण क्षयमुक्त होऊ शकतो याची जाणीव करून दिली. सौ. चौहान यांनी तातडीने या कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर उपचार सुरु झाले आणि आजच्या घडीला हा रुग्ण क्षयमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

उपाशीपोटी डॉटसची औषधे घेणे शक्‍य नसते. त्यामुळे अनेकजण मध्येच उपचार सोडून देतात. "उद्योगवर्धिनी'मुळे एक रुग्ण क्षयमुक्त होत आहे याचा आनंद होत आहे.
- डॉ. मंजिरी कुलकर्णी, क्षयरोग अधिकारी सोलापूर महापालिका

या रुग्णालयातील किमान 40 रुग्णांना रोज जेवण देण्याची आमची तयारी आहे. तसेच कर्त्या व्यक्तीस बाधा झाली आणि तो घरी बसून असेल तर त्याच्या पत्नीला किंवा कुटुंबातील महिलेला रोजगारही दिला जाईल.
- चंद्रिका चौहान, प्रमुख उद्योगवर्धिनी सोलापूर

Web Title: solapur news udyogvardhini lunch doctor health cancer patients