उजनीतील पाणीसाठा घटतोय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

केत्तूर - जानेवारीत 99 टक्के, तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 65 टक्के असणारा उजनी धरणाचा पाणीसाठा एप्रिलच्या सुरवातीलाच 38 टक्‍क्‍यांवर येऊन पोचला आहे. मात्र, गतवर्षी या वेळी हाच पाणीसाठा 15 टक्के इतका होता. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. सिंचन आणि जिल्ह्यातील बहुतांश पाणीपुरवठा योजना उजनी धरणाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.

गतवर्षीच्या तुलनेने या वर्षी धरणाचा पाणीसाठा चांगला असला, तरी गेल्या 10-12 दिवसांत सोलापूर शहराला पिण्यासाठी म्हणून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पाणलोट क्षेत्र रिकामे होऊ लागले आहे. त्यामुळे बॅकवॉटरमधील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शनिवार, ता. 24 मार्चपासून सोलापूरसाठी भीमा नदीतून 15 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात आल्याने करमाळा, दौंड, कर्जत, इंदापूर भागातील पाणलोट क्षेत्र उघडे पडू लागले आहे, तर तिकडे भीमा नदीतून सोलापूरसाठी औज बंधाऱ्यात पाणी चालले आहे. त्यातच एप्रिल व मे असे उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असताना भविष्यात उजनीचे पाणी पुन्हा एकदा (एक पाळी) सोडले जाणार असल्याने पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उजनी धरण यंदा पूर्ण क्षमतेने म्हणजे 113 टक्के भरूनही प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही पाण्याचे योग्य नियोजन आखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. 

Web Title: solapur news Ujani dam Water levels decrease