बेडर, बेरड, रामोशी समाजाचा विधानभवनावर 8 ला मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

सोलापूर - अखिल भारतीय बेडर, बेरड व रामोशी समाज कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येत्या काही दिवसामध्ये समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 8 ऑगस्टला विधान भवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचे बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 7 सप्टेंबर या जन्मदिवसाचा सरकारला विसर पडला आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या समाजाच्या वतीने आज हा मोर्चा काढण्यात आला होता. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची 7 सप्टेंबर ही जयंती सरकारी कार्यालयांमध्ये साजरी करावी, इनाम वर्ग अ व बच्या जमिनी रामोशी समाजाला परत मिळाव्यात, उमाजी नाईक यांच्या भिवडी (ता. पुरंदर, जिल्हा पुणे) या गावी राष्ट्रीय स्मारक व्हावे, समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

Web Title: solapur news vidhanbhavan rally by bedar, berad, ramoshi society