सोलापूरला 50 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

विजयकुमार सोनवणे
रविवार, 28 जानेवारी 2018

थकबाकीचा प्रश्‍न कायम 
पाण्याच्या थकबाकीमुळे सोलापूर शहराला पाणी मिळण्यास उशीर झाला. शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर पाणी सोडण्यात आले, मात्र थकबाकीचा प्रश्‍न मात्र कायम राहिला आहे. याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अन्यथा प्रत्येक वेळी शासन आणि महापालिका यांच्यात थकबाकीवरून वाद-विवाद होण्याचीच शक्‍यता जास्त आहे.

सोलापूर : सोलापूर शहराला किमान ५० दिवस पुरेल ईतका पाणीसाठा औज बंधाऱ्यात झाला नाही. बंधारा  "ओव्हरफ्लो' झाल्यामुळे शहराला सोमवारपासून (ता. 29) नियमित तीन दिवसांआड पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. 

औज बंधाऱ्यात साडेचार मीटर पाणी साठविण्यात आले आहे. टाकळी येथील भीमानदीत आठ फूट पाणी साठविण्यात येणार आहे. दरम्यान, चिंचपूर बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचले असून, शनिवारी सायंकाळपर्यंत एक मीटर पाणीसाठा झाला होता. चिंचपूरमध्ये किती पाणी साठणार हे विसर्ग केलेले पाणी किती आहे, त्यावर अवलंबून असणार आहे. बंधाऱ्यात पाणी आल्यामुळे आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही बाजूंच्या पात्रात विजेच्या मोटारी सुरू होण्याची शक्‍यता आहे. उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरवायचे असेल तर पाण्याचा उपसा होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. 

औज बंधारा ओव्हरफ्लो झाला असला तरी चिंचपूर बंधाऱ्यातही पाणी साठविले जाणार आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दोन्ही बंधारे भरल्यानंतर पाणी सोडण्याची कार्यवाही बंद केली जाणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने चार दिवआंआड पाण्याचे नियोजन केले होते. ते आता पूर्ववत होण्याची शक्‍यता आहे. 

थकबाकीचा प्रश्‍न कायम 
पाण्याच्या थकबाकीमुळे सोलापूर शहराला पाणी मिळण्यास उशीर झाला. शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर पाणी सोडण्यात आले, मात्र थकबाकीचा प्रश्‍न मात्र कायम राहिला आहे. याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अन्यथा प्रत्येक वेळी शासन आणि महापालिका यांच्यात थकबाकीवरून वाद-विवाद होण्याचीच शक्‍यता जास्त आहे.

Web Title: Solapur news water shortage in Solapur