सोलापुरात पाणीटाकीला भगदाड 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 3 जानेवारी 2018

सोलापूर - भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील ब्रिटिशकालीन साठवण टाकीला भगदाड पडले आहे. त्यामुळे टाकीचा परिसर धोकादायक झाला असून, त्याची वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. या टाकीवर निम्म्या शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकरुख, उजनी आणि टाकळी हे तीन स्रोत आहेत. त्यापैकी सर्वांत जुनी योजना ही एकरुख तलावाची आहे. 1932 पासून या योजनेतून पाणी घेतले जाते. 1932 ते 1946 पर्यंत या केंद्रावर फिल्ट्रेशनची सोय नव्हती. 1946 पासून ती सोय झाली. 

सुमारे साडेचार दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता या टाकीची आहे. ती ब्रिटिशकालीन असल्याने टाकीसाठी वापरलेले स्टील गंजले आहे. टाकीचा संपूर्ण परिसर धोकादायक झाला आहे. सुमारे 25 बाय 40 इतक्‍या आकाराचा तुकडा निघाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला जाळीचे आवरण लावण्यात आले आहे. एखादी वजनदार व्यक्ती या टाकीच्या स्लॅबवरून चालत गेली तर ती थेट टाकीतच पडणार आहे. 

..तर होईल पाणीपुरवठा विस्कळित 
या धोकादायक टाकीबाबत तत्परतेने निर्णय घेऊन कार्यवाही न केल्यास या केंद्रावर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणीपुरवठा विस्कळित होऊ शकतो. पर्यायाने त्याचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्यावर निश्‍चित होणार आहे. 

हा परिसर आहे अवलंबून 
या योजनेवर घोंगडेवस्ती, मड्डीवस्ती, जोडभावी पेठ, रविवार पेठ, जोडबसवण्णा पेठ, मंत्री चंडकनगर, हनुमाननगर, शाहीरवस्ती, जम्मावस्ती, मुकुंदनगर, जम्माचाळ, बुधलेगल्ली, मराठावस्ती, बाळीवेस, पंजाब तालीम, पंजाब तालीम, वडारगल्ली, तुळजापूर वेस, पश्‍चिम मंगळवार पेठ, विजापूर वेस, कुंभार वेस आणि बोरामणी तालीम परिसर. 

टाकीची तांत्रिक तपासणी केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा करणे शक्‍य आहे. तथापि, याच परिसरात नवीन टाकी बांधण्याचे नियोजन आहे. या संदर्भात आवश्‍यक कार्यवाही करण्याचे आदेश खातेप्रमुखांना दिले आहेत. 
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त

Web Title: solapur news water tank hole