पावसाची दडी; खरिपाचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

सोलापूर - मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत राज्यात केवळ १६ लाख सहा हजार हेक्‍टरवरच पेरण्या झाल्या आहेत. आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येवू शकते. 

शेतकऱ्यांनी खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर मशागतीची कामे उरकली आहेत. परंतु, मागील दहा-पंधरा दिवसांपासून बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊसच झालेला नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस झाला. कापूस व भात, तूर, सोयाबीन वगळता अन्य पिकांची पेरणी दहा टक्‍क्‍यांपेक्षाही कमी झाली आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले असून, पेरणीसाठी त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील बंधाऱ्यांसह धरणांमध्येही सध्या मुबलक पाणीसाठा नाही. पेरणी केलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. 

कर्जमाफीचा खोळंबा, तूर-हरभरा तसेच ऊसबिलाची रक्‍कमही मिळेना, शेतीमालाचे दर घसरले आहेत. त्यातच पावसाने लावलेल्या विलंबामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर संकटाचे दुष्टचक्र कायम आहे. पावसाने विलंब लावल्याने शेतकऱ्यांबरोबरच सरकारचीदेखील चिंता वाढली  आहे.

Web Title: solapur news weather farmer