कोरेगाव भीमा घटनेनंतर सोलापुरात आंदोलन, दगडफेक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

दयानंद महाविद्यालय परिसरात एका खासगी वाहनावर दगडफेक करण्यात आली. तर रुपाभवानी मंदिर परिसरातील डी मार्टजवळ एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. मार्केट यार्डात हमालांच्या काम बंद आंदोलनामुळे वातावरण चिघळले. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील आणि पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला

सोलापूर - कोरेगाव भीमा येथे दोन गटात झालेल्या दंगलीचा परिणाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही दिसून येत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांनी काम बंद आंदोलन केल्याने वातावरण चिघळले आहे. पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्तात वाढ केले आहे. 

दयानंद महाविद्यालय परिसरात एका खासगी वाहनावर दगडफेक करण्यात आली. तर रुपाभवानी मंदिर परिसरातील डी मार्टजवळ एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. मार्केट यार्डात हमालांच्या काम बंद आंदोलनामुळे वातावरण चिघळले. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील आणि पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

हैदराबाद रस्त्यावर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही वेळ रास्ता रोकोही केला. 

Web Title: solapur news: western maharashtra agitation