गॅस शवदाहिनीकरीता 80.36 लाख रु निधी मंजुर 

हुकूम मुलाणी    
बुधवार, 14 मार्च 2018

जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्यांच बैठकीत पक्षनेते अजित जगताप यांच्या प्रयत्नांना यश आले. यामध्ये सोलापुर रोड हिंदु स्मशानभुमी मध्ये गॅस शवदाहिनी उभा करणे करीता 80.36 लाख रु च्या कामास प्रशासकीय मंजुरी व निधी वितरीत करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली

मंगळवेढा -  नगरपरिषदेस जिल्हा नियोजन समिती सोलापुर कडुन सन 2017-18 नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत गॅस शवदाहिनीकरीता 80.36 लाख रु  निधी मंजुर झाला.                          

जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्यांच बैठकीत पक्षनेते अजित जगताप यांच्या प्रयत्नांना यश आले. यामध्ये सोलापुर रोड हिंदु स्माशानभुमी मध्ये गँस शवदाहिनी उभा करणे करीता 80.36 लाख रु च्या कामास प्रशासकीय मंजुरी व निधी वितरीत करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली. पालकमंत्र्याकडे नगरपरिषदेने  नाविन्यपुर्ण योजनेतुन गँस शवदाहिनीची  मागणी केलेल्या प्रस्तावास मंजुरी व निधी वितरणाची मागणी केली असता, ती मान्य करुन सदर प्रस्त्तावास मंजुरी देण्यांत आली होती. यानंतर नगरपरिषदेने रितसर जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर जिल्हाधिकाय्रांनी प्रशासकीय मान्यता व निधी वितरणचा आदेश दिला झाला . सदर प्रस्ताव मंजुर व निधी करीता पालकमंत्री व जिल्हाधिकारीकडे नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, मुख्याधिकारी डॉ.नीलेश देशमुख, आरोग्य सभापती प्रविण खवतोडे, महिला व बालकल्याण सभापती अनिता नागणे, बांधकाम सभापती पारुबाई जाधव, नियोजन व विकास सभापती भागीरथी नागणे, संकेत खंटके,राजश्री टाकणे, सुमन शिंदे,पांडुरंग नाईकवाडी, सब्जपरी फकीर, अनिल बोदाडे,लक्ष्मीबाई म्हेत्रे,रामचंद्र कोंडुभैरी,रतन पडवळे, निर्मला माने, प्रशांत यादव,राहुल सांवजी,बशीर बागवान या सर्वानी प्रयत्न केले. 

शवदाहिनी उभारल्यानंतर लाकडाचा वापर बंद होऊन पर्यावरणाचा –हास व प्रदुषण होणार नाही. तसेच ही सुविधा अल्प दरात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आ. भारत भालके व राहुल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य़काळात विविध प्रकारची नाविन्यपुर्ण कामे आम्ही करणार आहोत

- चंद्रकांत घुले उपनगराध्यक्ष

Web Title: solapur news western maharashtra development