'योग करणाऱ्यांना देशात अच्छे दिन'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

सोलापूर - "पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार आता योग करू लागले आहेत. मुख्यमंत्री, मंत्री होण्यासाठी काहीजण योग करत आहेत. त्यामुळे देशात योग करणाऱ्यांना आता अच्छे दिन आले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मला अमेठीमध्ये योग शिबिर घेण्यास सांगितले, तर त्यांच्यासाठीही मी शिबिर घेईन,' असे योगगुरू रामदेवबाबा यानी आज सांगितले. योग शिबिरानिमित्त ते सध्या सोलापुरात आहेत. काळ्या धनाविरोधात सुरू केलेली लढाई अखेरपर्यंत कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Title: solapur news yog acche din ramdev baba