परदेशातील शाळांना योगासनांचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सोलापूर - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने परितेवाडी-कदमवस्ती (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी व्हिएतनाम व अर्जेंटिना या देशाच्या शाळेतील मुलांना योगाचे धडे दिले. त्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवली. "स्काइप इन क्‍लासरूम' या उपक्रमांतर्गत हे धडे देण्यात आले. 

व्हिएतनामच्या मिन्ह डेम स्कूलच्या शिक्षिका न्यूजिन थाय, अर्जेंटिनाच्या ज्युअन अल्वारेज शाळेतील मारिया जोस व दिल्लीच्या डी. एल. एफ. पब्लिक स्कूलच्या दुहिता परमार या शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील मुलांना ही योगासनाची प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी चक्रासन, भुजंगासन, पश्‍चिमोत्तसंन, वक्रसन, शीर्षासन, धनुरासन, मत्स्यसन आदी आसनांचा सराव करून दाखविला. प्रथमेश कदम, ओम कदम, प्रतीक्षा कदम, जय शिंदे, हर्षवर्धन शिंदे, स्वप्नील कदम या मुलांनी योगासने केली. 

व्हिएतनामच्या शिक्षिका थाय यांनी त्यांच्या शाळेत देखील प्रत्येक शनिवारी असा सराव करून घेणार असल्याचे सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जगातील 82 देशांशी कदमवस्तीची शाळा आपले नावीन्यपूर्ण उपक्रम मांडत आहे. या शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून तंत्रज्ञानाच्या वापरावर शाळेचा विशेष भर राहिलेला आहे. योगासनाचा प्रसार व प्रचार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा हा एक प्रयोग आहे. या पुढेही असे अभिनव उपक्रम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सांगितले. 

Web Title: solapur news yoga